👁 12 Views

कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

प्रतिनिधी
नेरळ येथून पिंपरी येथे आजीकडे आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कारमध्ये, घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना एक महिन्यानंतर उघडकीस आली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. पीडित तरुणीची प्रकृती खालावली  असून, नेरळमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.

सौरभ शेट्टी, नसीब खान, हर्षल भाटिया या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली असून, पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च ते मे 2017 दरम्यान पिंपरी आणि औद्योगिक वसाहतीमध्ये जाणार्‍या रस्त्यावर घडला आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरळ येथे राहणारी 21 वषीय तरुणी मार्च महिन्यात सुटीसाठी पिंपरी येथील अजमेरा कॉलनीत राहणार्‍या आजीकडे आली होती. घराशेजारी असलेल्या उद्यानात पीडित तरुणी सायंकाळी जात असे.
त्या वेळी सौरभ व त्याच्या साथीदाराने तिच्याकडे मैत्रीसाठी विनंती केली. दोन-चार वेळा विनंती केल्याने पीडित तरुणीने त्यांच्याशी मैत्री केली. 
दरम्यान, सौरभ आणि त्याच्या मित्राने तिला फिरायला जाऊ असे सांगून एका आयट्वेंटी कारमध्ये बसवून पिंपरी परिसरात नेले. तेथे शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर कारमध्ये मागील सीटवर आळीपाळीने बलात्कार केला. 

सौरभ व त्याच्या मित्रांनी हा प्रकार त्यांच्या इतर मित्रांना सांगितला. त्यानंतर या सर्वांनी पीडित मुलीला; तसेच तिची आई आणि काकास जिवे ठार मारण्याची धमकी देत, मारहाण करत कारमध्ये बसवले आणि औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर नेऊन सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार वारंवार पीडित तरुणीसोबत घडला; मात्र भीतिपोटी तिने कोणालाही काहीच सांगितले नाही.  दरम्यान, तरुणीला वेदना होऊन ती आजारी पडली. त्यामुळे आजीने तिला नेरळला तिच्या घरी सोडले. आई-वडिलांनी तिला रुग्णालयात दाखले केले असता हा प्रकार समोर आला. 
डॉक्टरांच्या हा प्रकार लक्षात आल्याने तरुणीने हा सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. आई-वडिलांनी तत्काळ याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो शून्य नंबरने तपासासाठी पिंपरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पिंपरी पोलिसांनी तत्काळ तपास करत संशयित तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक रत्ना सावंत करीत आहेत.




सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर 
आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *