👁 10 Views

राज्यात 2 ते 4 जून सर्वदूर पावसाची शक्यता

पुणे, दि. 27 –  मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केल्याने तो वेगाने पुढे सरकणार असून येत्या २, ३, ४ जून दरम्यान राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. साबळे हे कृषी हवामान शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख असून गेल्या १५ वर्षांपासून ते शेतीच्या दृष्टीने मान्सूनचा अंदाज व्यक्त करतात. त्यासाठी त्यांनी मॉडेल तयार केले असून हा अंदाज मार्च, एप्रिल व मे महिन्यातील कमाल तापमान, सकाळ व दुपारची आर्द्रता, वा-याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. त्यासाठी त्यांना डॉ. खासेराव गलांडे आणि अभियंता विलास नजन हे सहाय्य करीत आहेत.
डॉ. साबळे यांनी सांगितले की, दरवर्षीचा मान्सून वेगळा असतो. त्याचे वितरणही वेगळे असते. त्यादृष्टीने राज्यात विभागवार नेमका किती पाऊस पडेल व खंड कधी असेल, याची माहिती शेतक-यांना मिळणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने तो पिकाचे नियोजन करु शकतो. स्थानिक पातळीवर अंदाज व्यक्त करायचा असेल तर किमान ३० वर्षांचा डाटा आवश्यक असतो. ज्या ठिकाणी सरासरी ऐवढा पाऊस पडेल असे म्हटले जाते, तेव्हा तेथे फरक पडू शकतो़ मध्ये खंड पडू शकतो व पुढच्या काळात कमी दिवसांत अधिक पाऊस पडून तो सरासरीएवढा येऊ शकतो. 
राज्यात २, ३ व ४ जून दरम्यान सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी या काळात ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस होईल. तेथे पेरणी लवकर करण्यास हरकत नाही. पेरणी लवकर झाल्यास यंदा उत्पादन जास्त होईल. या वर्षी मान्सून कालावधीत एलनिनोचा प्रभाव राहणार नसल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. वा-याचा वेग कमी आढळल्याने २० जून ते १० जूनच्या दरम्यान पावसात खंड पडतील. विदर्भ व मराठवाड्यात पावसातील खंडाचा कालावधी मोठा राहण्याची शक्यता आहे. तसेच मार्च, एप्रिल व मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदविले गेल्याने मान्सूनचे आगमान वेळेपूर्वी होणे शक्य आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाचे मुद्दे
* जुलैच्या पहिल्या आठवड्यात खंड पडण्याची शक्यता
* यवतमाळला अतिवृष्टी होण्याची शक्यता
* राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश या परिसरात अतिवृष्टी तर काश्मीर, उत्तर प्रदेश या पट्ट्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता
* पुढील वर्षापासून औरंगाबाद, नांदेडचे मॉडेल बनवण्याचा प्रयत्न
डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलेला पावसाचा अंदाज (मिमी)
जून ते सप्टेंबर २०१७
विभाग          सरासरी अंदाज टक्केवारी
अकोला           ६८३.७ ६८३.७ १००
नागपूर           ९५८ ९५८         १००
यवतमाळ           ८८२ ९२६         १०५
शिंदेवाही         ११९१ १२४० १०४
(चंद्रपूर)
परभणी          ८१५          ८१५         १००
दापोली          ३३३९ ३५०७ १०५
निफाड           ४३२ ४५७         १०६
जळगाव            ६३९ ६५०         १०१
पाडेगाव            ३६० ३६८         १०२
सोलापूर            ५४३ ५४३         १००
राहुरी                    ४०६ ४०६         १००
पुणे                    ५६६ ५९४          १०५
ऑनलाइन लोकमत

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *