अमरावती | आजपर्यंत भाड्याच्या घरात राहणारे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांना अखेर हक्काचं घर मिळालंय. आयुष्यभर ज्या अपंग, अनाथ आणि वृद्धांच्या हक्कांसाठी बच्चू कडू झटले त्यांच्याच पूर्णामाय अपंग, अनाथ आणि वृद्ध पुनर्वसन केंद्रामध्ये त्यांचं हे घर उभं राहितंय.
वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या घराचा बैठकीचा संपूर्ण भाग बांबूचा असणार आहे. तसेच तो शेणाने सारवलेला असेल. येणाऱ्या प्रत्येकाला जमिनीवर बसावं लागेल. त्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनांप्रमाणेच त्यांचं घरही वैशिष्ट्यपूर्ण असणारआहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





