बीड | विठाई नर्सिंग कॉलेजचा प्राचार्य राणा डोईफोडेवर छेडछाडीचा आरोप करणाऱ्या १२ मुलींपैकी ६ मुलींनी माघार घेतलीय. उरलेल्या ६ मुलींनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. तसेच आपल्यावर तक्रार मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव असून ६ मुलींनी या दबावातूनच तक्रार मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी साधी कलमं लावल्यानं आरोपीला एका दिवसात जामीन मिळाला, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. तर सुरक्षेच्या कारणामुळे काही मुलींनी काल वसतिगृह सोडलं.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





