👁 12 Views

अरुणभाईंचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व आणि नम्रतेचा अनोखा संगम…- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगावदि. 29 : अरुणभाईंचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व आणि नम्रतेचा अनोखा संगम आहे. केवळ वक्तृत्वच नव्हे तर आचरणही श्रेष्ठ असणारे ते एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत,अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा गुणगौरव केला.
राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई  गुजराथी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त  चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री. गुजराथी यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास प्रमुख अतिथि म्हणून मुख्यमंत्री संबोधित करीत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे,  राज्याचे महसूलमदत व पुनर्वसनसार्वजनिक बांधकाम (सा.ऊ.वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलवैद्यकीय शिक्षणजलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजनकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटीलजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष  उज्ज्वलाताई पाटील,खासदार रक्षाताई खडसेआमदार एकनाथराव खडसेराज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलआमदार सर्वश्री अमरिश पटेलचंद्रकांत सोनवणेसंजय सावकारेसुरेश भोळेस्मिताताई वाघहरीभाऊ जावळेचंदुभाई पटेलडॉ. सतिष पाटीलचोपड्याच्या नगराध्यक्ष मनिषा चौधरी,  कवी ना. धो. महानोरमाजी खासदार ईश्वरबाबू जैनडॉ. गुणवंतराव सरोदेचोपडा पिपल्स बॅंकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी आदी मान्यवर  उपस्थित होते.
            यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीराजकारणात अनेक लोक भेटतात पण त्यातील काही मनावर छाप पाडतातत्यातील अरुणभाई एक आहेत. समाजाला दिशा देण्याचे काम अरुणभाईंनी केले आहेचांगले कर्तृत्ववक्तृत्व आणि नम्रतेचा समन्वय असलेले दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणजे अरुणभाई होय. राजकीय जीवनात संयम कसा ठेवायचा हा पहिला धडा मी अरूणभाई गुजराथी यांच्याकडून शिकलो. नम्रतेने प्रत्येकाचे समाधान करणारे नेते असलेले अरूणभाई दिशादर्शन करतातटिकाही चांगली करतात. चांगल्या सूचना करतातअशी अरुणभाई गुजराथी यांची स्वभाव वैशिष्ट्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितली.
श्री. फडणवीस पुढे म्हणालेमी विधीमंडळाच्या सभागृहात नवखा आमदार असतांना ते अध्यक्ष होते. त्यावेळी ते मला नेहमी प्रोत्साहन देत. माझे भाषण चांगले झाले की ते मला चिठ्ठ्या पाठवून कौतूक करीत. त्यांच्या चिठ्ठ्या आजही मी जपून ठेवल्या आहेतअशी आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली. त्यांच्या कर्तृत्व आणि अनुभवाने मिळालेले ज्ञान त्यांनी नेहमी समाजाच्या हितासाठीच वापरले. त्यांच्याकडून असेच मार्गदर्शन लाभत राहो,अशी सदिच्छा व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी अरुणभाई गुजराथी यांना दीर्घायुष्य चिंतीले.
पेचप्रसंग सावधपणे हाताळण्याचे कसब – विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
राजकारणातील सालस व्यक्तिमत्व म्हणून अरुणभाई गुजराथी आम्हाला आठवतात.  आपल्या नम्र स्वभावाने ते साऱ्यांना आपलेसे करुन घेतात. याच बळावर त्यांनी विधीमंडळ सभागृहातील अनेक कठीण पेचप्रसंगही अत्यंत सावधपणे हाताळले.
सामान्य माणसाला आपलेसे वाटणारे अरुणभाई – चंद्रकांत पाटील
बऱ्याचदा कर्तृत्व आणि नम्रता या एका ठिकाणी पहावयास मिळत नाही. मात्र या गुणांचा समन्वय असणारे अरुणभाईंचे व्यक्तिमत्व हे नेहमीच आम्हाला मार्गदर्शक आहे.  त्यांचे वक्तृत्व हे सामान्य माणसाला कोणताही विषय सोप्या पद्धतीने मांडणारे आहे. त्यामुळे ते सामान्य माणसाला नेहमीच आपलेसे वाटतात.
अरुणभाईंचे कार्य मार्गदर्शक – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
अरुणभाईंचे कार्य हे नेहमीच समाजाला  मार्गदर्शक आहे. एकनिष्ठता हा त्यांचा गुण वाखाणण्यासारखा आहे. त्यांच्या समवेत काम करतांना आम्ही खूप शिकलो.  समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती कौतुकास्पद आहे.
प्रत्येक ठिकाणी आदर्श निर्माण केला – माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
पुण्याला शिकत असतांना मी आणि अरुणभाई एका वर्गात होतो. गांधीवादी संस्कारात वाढलेल्या अरुण भाईंनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही  चोपड्याच्या नगराध्यक्षपदापासून केली. आणि नगराध्यक्षाची आदर्श कारकिर्द कशी असावी याचा आदर्श त्यांनी लोकांसमोर ठेवला. असा आदर्श त्यांनी ज्या ज्या पदावर काम केले तेथे निर्माण केला.  राष्ट्रकुल संसदीय मंडळात  लंडन येथे भारताची भूमिका त्यांनी प्रखरपणे मांडली.  त्यांच्या अभ्यासूवृत्तीने आणि नम्र स्वभावाने त्यांनी अनेक ठिकाणी आपले कर्तृत्व सिद्ध केले.
साधी राहणी उच्च विचारसरणी हे वैशिष्ट्य- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे
अरुणभाई गुजराथी हे प्रत्येक काम बारकाईने आणि दक्ष राहून करतात. याचा अनुभव आपण सहकारी मंत्री म्हणून त्यांच्या सोबत घेतला आहे.  राजकारणात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी  हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. दुःखात धीर देणारे एक मित्र म्हणूनही मी त्यांना ओळखतो. त्यांचे हे जीवन गाणे असे अखंड सुरु रहावे.
एकनिष्ठेतेचे प्रतिक अरुणभाई- गुलाबराव पाटील
अरुणभाई गुजराथी म्हणजे राजकारणातील एकनिष्ठतेचे प्रतिक आहे.  आपल्या नम्रतेने विरोधकाला शांत करुन आपलेसे करण्याची किमया त्यांच्याकडे आहे.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरविशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबेपोलीस अधिक्षक दत्तात्रय काराळेपोलीस उपअधिक्षक प्रशांत बच्छावउपविभागीय अधिकारी संजय गायकवाडतहसिलदार दीपक गिरासे आदी तसेच चोपडा परिसरातील नागरिकलोकप्रतिनिधी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुणभाई गुजराथी गौरव समितीचे डॉ. सतिष पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *