👁 12 Views

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंती निमित्त पंढरपूरात भव्य ‘मोटार सायकल मिरवणूकीचे’आयोजन करण्यात आले

दि.28 मे, 2017 रविवार रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंती निमित्त पंढरपूरातील तमाम हिंदुत्ववादी ,देशप्रेमी व सावरकर प्रेमी वर्गा तर्फे भव्य ‘मोटार सायकल मिरवणूकीचे’आयोजन केलेले होते.
पंढरपूरतील अनेक अशा भागातून सर्व विद्यार्थी ,युवक वर्ग ह्या उपक्रमात सहभागी झालेला होता.
हलग्यांच्या कडकडाटात ‘मोटार सायकल मिरवणुक’ सायंकाळी 7.30 वाजता पाडुरंग रुक्मिणीची धुपारती संप्पन्न झाल्यावर नगर प्रदक्षिणा घालून प्रथमतः छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्या कडे मार्गस्त झाली. छ.शिवाजी महाराजांना नगरसेवक ह्रूषिकेश उत्पात, श्रीकांत (महाराज) हरिदास व भागवत महाजन बडवे यानी पुष्पहार घालून मानवंदना दिली.
त्यानंतर देशाभिमानी घोषणा देत भव्य मिरवणूक ही स्वा.सावरकरांच्या पुतळ्या कडे निघाली.ह्या भव्य मिरवणुकीचे नेतृत्व मा.भागवत बडवे महाजन व मा.पार्थ बेणारे हे करीत होते
मिरवणूक स्वा.सावरकरांच्या पुतळ्या लगत येउन पोहोचल्यावर हलग्यांच्या कडकडाटात ‘सावरकर का क्या संदेश ,अखंड करना अपना देश’ तसेच स्वा.सावरकरांचा विजय असो अशा जोरदार घोषणांना प्रारंभ झाला.
ह्या मिरवणूकीमध्ये मध्ये
अखिल भारतीय छावा विद्यार्थी संघटनेचेही अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
छावा विद्यार्थी आघाडीने ह्या वर्षी संप्पन्न झालेल्या मिरवणुकी मधे अतिशय मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले.
त्यानंतर सर्व मिरवणूकीतील कार्यकर्ते स्वा.विनायक दामोदर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यासाठी तसेच मानवंदना देण्याकरिता व्यासपिठावर गेले.
त्या ठिकाणी मिरवणूकीचे स्वागत करताना मुख्य
अभयसिंह इंचगावकर , प्रशांत खंडागळे,अनिकेत बडवे,सचिन व्यवहारे आदि उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *