👁 11 Views

बारावीत पुन्हा मुलीच हुशार, 93.05 टक्के निकालासह मुलींची बाजी; कोकण विभाग अव्वल



पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई प्रमाणेच एचएससी बोर्डातही मुलींनीच बाजी मारली आहे. 93.05 टक्के निकासासह मुली अव्वल ठरल्या आहेत. बारावी निकालत कोकण विभाग (95.20 टक्के) सर्वात हुषार ठरला असून मुंबई विभागाचा (88.21 टक्के) सर्वात कमी निकाल लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 89.83 टक्के आहे. राज्याचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत 2.09 टक्क्याने निकाल वाढला आहे.

विभागनिहाय निकाल…
> कोकण विभाग 95.20 टक्के
> पुणे विभाग 91.16 टक्के
> कोल्हापूर विभाग 91.40 टक्के
> औरंगाबाद विभाग 89.83 टक्के
> नागपूर विभाग 89.50 टक्के
> अमरावती विभाग 89.12 टक्के
> नाशिक विभाग 88.22 टक्के
> लातूर विभाग 88.22 टक्के
> मुंबई विभाग 88.21 टक्के
– बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.09 ट्क्क्याने वाढले आहे.



येथे पाहू शकता निकाल…
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना सविस्तर निकाल पाहता येणार आहे.


बारावीच्या परीक्षेला यंदा 15 लाख पाच हजार 365 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा बारावीच्या परीक्षा उशिरा सुरू झाल्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सुरुवातीला उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर तपासणीचे काम सुरळीत झाले. मात्र त्यामुळे निकालाला जरा वेळ लागल्याचे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. बारावीची पुरवणी परीक्षा 11 जुलैपासून सुरू होईल, असेही पाटील म्हणाले.



सीआयएससीई दहावीत पुण्याची मुस्कान पहिली 
सीआयएससीईने सोमवारी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले. दहावीत पुण्याची मुस्कान अब्दुल्ला पठाण बंगळुरूचा अश्विन राव 99.04 टक्के गुणांसह प्रथम आले आहेत. बारावीत कोलकात्याची अनन्या मैती ही 99.05 % गुणांसह प्रथम आली. बारावीत 96.47 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीचा निकाल 98.53 % लागला.





सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *