👁 9 Views

बीड जिल्ह्यात शेतकरी क्रांती मोर्चाने होणार शेतकरी संपाला सुरूवात

शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण्यासाठी चालढकल करत असलयाने महाराष्ट्रातील शेतकरी उद्यापासून संपावर जाणार आहेत आणि बीड जिल्ह्यात या शेतकरी संपाची सुरूवात शेतकरी क्रांती मोर्चाने होणार असून उद्या सकाळी आकरा वाजता या मो्चाची सुरूवात होणार आहे


आणि उद्यापासून सुरू होणार्या या शेतकरी संपाला यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी आता एकंञ होत असल्याचे दिसून येत आहे शेतकरी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून अनेक दिवसापासून संपासाठी वातावरणनिर्मितीचे काम केले जात आहे. त्यासाठी विविध भागात बैठकानी जोर धरला आहे.तर दोन दिवसापुर्वी मुख्यमंञ्यानी शेतकर्याना चर्चेला बोलवले होते परंतू मुख्यामंत्र्यासोंबत चर्चा रून आश्वासन मिळाल्याने शेतकरी संपावर जाणारच म्हणून ठाम आहेत  अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आणि विषेशता मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात   शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.आणि  नेहमीच शेतमालाचे बाजारात होणारे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय खड्ड्यात लोटला गेला आहे. यामुळे उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप शेतकऱ्यातून  होत आहे त्यामुळे शेतकर्यानी हे शेतकरी संपा पाऊल उचलल असल्याच बोलल जात आहे 
त्यामुळे उद्यापासून कर्ज काढून शेती करण्यापेक्षा संपावर जाण्याचा निर्णय महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील  शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व सरकारची सर्व धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत जिल्हातील संपाचे हत्यार उपसले आहे आणि या शेतकरी संपाची सुरूवात बीड जिल्ह्यात शेतकरी क्रांती मोर्चाने होणार आहे 


१ ते ७ जून पर्यंत असणार शेतकरी संप 


शेतकर्याच्या शेतमालाचे बाजारात होणारे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय खड्ड्यात लोटला गेला आहे. यामुळे उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप करत १ जून पासन राज्यातील बीड जिल्ह्यातील शेतकरी उद्यापासून संपावर जाणार आहेत आणि शेतकर्याचा हा संप १ते ७ जून पर्यत असणार आहे आणि या संपाच्या कार्यकाळात शेतकरी भाजीपाला कोणत्याच बाजारात विकणार नाही , गाई म्हशीचे दुधही शेतकरी घरी पाहीजे तेवढच काढणार आहेत  आणि एक ही शेतकरी बाजारात भाजीपाला विकणार नसल्याच समजत आणि शेतकरी बाजरात आणि डेअरीवर दुध विकायला जाणार नाहीत 

निलेश चाळक जिरेवाडी मो,९७६७८९४६१९


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *