👁 13 Views

शेतकऱ्यांनी राज्यभरात पुकारलेल्या संपाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले.

सचिन व्हटे।  


  औरंगाबाद, दि. 1 – राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे.


औरंगाबादच्या जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शंभराहून अधिक शेतकरी बाजार बंद करण्याचे आवाहन करीत होते. त्याच दरम्यान एका ट्रकची टायरमधील हवा सोडत असताना व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांवर हल्ला केला.


(शेतकऱ्यांचा संप सुरू; दूध-भाजीपाला बंद!)


यात जयाजीराव सूर्यवंशी यांच्यासह 5 शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली, तर काही शेतकरी तेथून निघून गेले. या घटनेमुळे औरंगाबादेत गोंधळ निर्माण झाला आहे.


(शेतक-यांच्या संपाला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड)


संपाच्या पहिल्या दिवशी जवळपास अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत बाजाराकडे पाठ फिरवली . ज्या शेतकऱ्यांना आंदोलनाची माहिती नव्हती, ते शेतकरी उद्या संपामध्ये सहभागी होत आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध केला तरी आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीय. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो, कांदे फेकत बाजार बंद करण्याचा प्रयत्नही केला.


कशी ठरली संपाची दिशा?


पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी ३ एप्रिलला ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. ‘किसान क्रांती’ समन्वय समितीने बुधवारी पुणतांब्यात संपाची घोषणा केली. ४०हून अधिक संघटना संपात उतरल्या असल्याचे समन्वय समितीचे धनंजय जाधव, धनंजय धोरडे, जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले. शरद जोशी व रघुनाथ पाटील प्रणीत शेतकरी संघटना, खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी व संजीव भोर यांची ‘शिवप्रहार’ संघटना संपात उतरल्या आहेत.


बाजार समित्यांच्या फेडरेशनचे अध्यक्ष माजी आ. दिलीप मोहिते यांनीही बाजार समित्य

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *