👁 9 Views

संप म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं: प्रकाश आंबेडकर

सचिन

सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह

अकोला : शेतकऱ्यांनी पुकारलेला संप म्हणजे शेतकऱ्यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. असं मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार हे कारखानदारांचं सरकार होतं. तर भाजपचं सरकार हे व्यावसायिकांचं सरकार आहे. त्यामुळे शेतकरी सरकारपेक्षा ग्राहकाच्या विरोधातील आंदोलन करत आहे. त्यामुळे या संपाला आमचा पाठिंबा नाही. कारण की, शेतकरी या संपामुळे स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षाप्रमाणे हमीभाव मिळत नाही. तो त्यांना मिळाला हवा ही आमची अपेक्षा आहे.’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *