👁 8 Views

CBSE: आज दहावीचा निकाल, विद्यार्थ्यांना या वेबसाइटवर पाहाता येईल मार्कशिट

नवी दिल्ली-
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईचा आज (शनिवार) दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, निकाल दुपारी 12 वाजता संकेतस्थळावर जाहीर होईल. विद्यार्थी cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in वर निकाल पाहू शकतात.

 यंदा दहावीत 16.6 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दरम्यान, सीबीएसईचा बारावीचा निकाल 28 मे रोजी जाहीर झाला होता.

विद्यार्थ्यांना येथे पाहाता येईल निकाल…

विद्यार्थी आपला निकाल सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर पाहू शकतील.
– CBSE Class 10 results सिलेक्ट करावे.
– आपला रोल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि स्कूल कोड टाकावा.
– प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल. मार्कशीट डाऊनलोड करता येईल.

मागीलवर्षी विद्यार्थिनींनी मारली होती बाजी…

सीबीएसईच्या दहावीच्या निकालात विद्यार्थिनींनी बाजी मारली होती. 96.36 टक्के विद्यार्थिनी तर 96.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. एकूण निकाल 96.21 टक्के लागला होता. 2015 मध्ये निकालाची सरासरी टक्केवारी 97.32 होती.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *