पंढरपूर : गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील पत्रकार विठ्ठल हंबीरराव कवडे (वय ४६) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने गुरुवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, तीन भाऊ, एक विवाहीत बहीण असा परिवार आहे. २००२ साली त्यांनी पत्रकारीमध्ये प्रवेश केला. लोकमत बरोबर त्यांनी इतर दैनिकातही काम केले. पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. शुक्रवारी सकाळी गुरसाळे येथील स्मशान भुमीत अंतसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111