👁 8 Views

जीएसटी : सध्याच्या स्वरूपात लागू करणार नाही : ममता

कोलकाता/नवी दिल्ली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जीएसटीला विरोध दर्शवला आहे. जीएसटीचे जे सध्याचे स्वरूप आहे ते लागू करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. जीएसटी लागू झाल्यास गरीब आणि असंघटित क्षेत्राला मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्याचे अर्थमंत्री जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या तरतुदींमुळे नाराज आहेत.

यासंबंधी आम्ही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कडक शब्दांत पत्र लिहिणार असून त्यांना यात बदल करावाच लागणार असल्याचे त्या म्हणाल्या. केंद्र सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत असून एकतर्फी निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोपही ममता यांनी केला आहे. सध्या असलेल्या स्थितीनुसार जीएसटी लागू केल्यास चित्रपट आणि पुस्तक उद्योगालाही त्रास सहन करावा लागणार आहे. यासंबंधी आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. मुख्य सचिव वासुदेव बॅनर्जी यांना याविषयी सखोल माहिती असल्याने तेदेखील पत्र पाठवत असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. ममता यांनी गुरुवारीदेखील जीएसटीसंदर्भातील हा मुद्दा उपस्थित केला होता.
पुढील स्लाइडवर वाचा, पुढील वर्षी भारताचा विकास दर आठ टक्के राहील ; पनगढिया यांचा अंदाज…
पुढील वर्षी भारताचा विकास दर आठ टक्के राहील ; पनगढिया यांचा अंदाज
नवी दिल्ली   – भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदीच्या परिणामांतून बाहेर आली असून एप्रिल ते जून तिमाहीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजी दिसेल अशी अपेक्षा नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी व्यक्त केली आहे. आयोगाने तीन वर्षांत केलेल्या कामांची माहिती देताना ते पत्रकारांशी बोलत होते.   
जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये भारताने सर्वात तेजीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेचा बहुमान गमावला असून हा मान आता चीनकडे गेलेला असताना पनगढिया यांनी मांडलेल्या या मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या तिमाहीमध्ये भारताचा विकास दर कमी होऊन ६.१ टक्के राहिला, तर चीनचा विकास दर ६.९ टक्के नोंदवण्यात आला आहे. वार्षिक आधारावर गेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर  ७.१ टक्के नोंदवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर वाढून ७.५ टक्के राहण्याचा विश्वासही पनगढिया यांनी व्यक्त केला असून पुढील दोन वर्षांत विकास दर ८ टक्क्यांपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 सरकारने आर्थिक सुधारणांच्या दिशेने तेजीने प्रयत्न केले असल्याचेही पनगढिया यांनी सांगितले. सरकारच्या निर्णयांचा परिणाम येत्या काही वर्षांत दिसेल. सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांमध्ये जीएसटी सर्वात महत्त्वाचा निर्णय असून दिवाळखोरी कायदा हा दुसरा महत्त्वाचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.   एअर इंडियाचे खासगीकरण अवघड  असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *