👁 9 Views

युवक कॉग्रेेसच्या वतीने गरीबांना दुध वाटप…. शेतकर्‍यांच्या संपास झोपडपट्टी धारकांचा आशिर्वाद

पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने येथील पद्मावती झोपडपटटी येथे संपकरी शेतकर्‍यांकडुन प्राप्त झालेले दुध रुक्मिणी परिवाराचे युवा नेते सुनंजय पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले,मा.नगरसेवक किरण घाडगे,आण्णा धोत्रे,पंढरपूर शहर युवक कॉग्रेेसचे अध्यक्ष शंकर सुरवसे,सोपानकाका देशमुख,दत्तात्रय धोत्रे,विकी पवार संग्राम कारंजकर,बलदेव शिकलकर,सुरेश धोत्रे,विशाल धोत्रे,सागर पवार,महेश पवार,श्री जाधव यांच्यासह कॉग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.        यावेळी बोलताना युवक कॉग्रेसचे अध्यक्ष शंकर सुरवसे म्हणाले की,गेल्या तीन दिवसापासून आपला अन्नदाता शेतकरी संपावर गेला आहे.त्यांच्या संपास समाजातील सर्वच स्तरातून पाठींबा मिळत आहे.जगाचा पोशींदा असलेला शेतकरी  कर्जबाजारी झाल्याने आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करु शकत नाही त्यामुळे आत्महत्या करीत आहे.अशा वेळी सरकारकडून ठोस उपाययोजना करणे आवश्यक असताना हे शासन शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून देत आहे.निवडणूकीपुर्वी या भाजपावाल्यांनी कर्जमुक्तीचे आश्‍वासन दिल्यानेच त्यांच्या हाती जनतेने विश्‍वासाने सत्ता सोपविली होती.परंतू आता शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून उद्योगपती धर्जिणे धोरणे राबवीली जात आहेत.त्यामुळे संप करण्याची वेळ शेकर्‍यांवर आली आहे.या संपास पाठींबा व्यक्त करीत युवक कॉग्रेसही सक्रिय सहभागी झाली असून  अनेक दुधउत्पादक  शेतकर्‍यांनी आपल्या कडील दूध विक्री करण्याऐवजी गोरबरींबामध्ये वाटून टाकण्याचा निर्णय घेतला.त्यामुळेच आज आम्ही येथे दुध वाटप कार्यक्रम आयोजीत केला आहे.
          यावेळी पद्मावती झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना मोफत दूध वाटप करण्यात आले.येथील काही रहिवाशांनी दूध वाटप करण्याचे कारण विचारले असता शेतकर्‍यांच्या संपाबाबत त्यांना माहीती देण्यात आली.तेव्हा त्यांनी या संंपास पाठींबा व्यक्त करीत शेतकरी सुखी तर जग सुखी ही म्हण या राज्याचे मुख्यमंत्री विसरले असावेत अशी भावना व्यक्त केली.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *