पिरंगुट- राज्यातील दूध उत्पादक, कांदा उत्पादक शेतकरी यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. कबाड कष्ट करून शेतीत उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे, कामगार मिळत नाहीत तसेच खताचे भाव वाढत आहे. सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे, “हेच का भजपा सरकारचे अच्छे दिन’, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून पिकांना हमीभाव दिला पाहिजे, अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते केंद्र तसेच राज्यातील मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केले.
घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथे राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाला जाहीर पाठिंबा तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी यासाठी मुळशी तालुका राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी कामठे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती तुकाराम हगवणे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, सभापती कोमल वाशिवले, उपसभापती पांडुरंग ओझरकर, पंचायत समिती सदस्य राधिका कोंढरे, पक्षनिरीक्षक अर्जून गरूड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, तालुका अध्यक्ष सुनिल चांदेरे, माजी सदस्य शांताराम इंगवले, सुभाष अमराळे, माजी सभापती महादेव कोंढरे, रवींद्र कंधारे, बाळासाहेब सणस, तात्यासाहेब देवकर, विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र इंगवले, प्रवीण धनवे, सतीश सुतार, ऋतुजा साठे, प्रशांत रानवडे, रामदास पायगुडे आदी मान्यवर व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोटावडे फाटा येथील चौक अडविल्याने काही काळ वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रंगा लागल्या होत्या. तसेच आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पौडचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





