👁 12 Views

यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाेनशे अमराठी लोक मोफत शिकताहेत मराठी भाषा

मुंबई-आयबीएम कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला डाेंबिवलीतील रहिवासी कौशिक लेले हा युवक दोन ब्लॉग व यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देश-विदेशातील अमराठी लोकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत अाहे. अगदी माेफत चालवल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणाची चांगले फळे दिसत अाहेत. त्याच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुमारे २०० अमराठी लोक मराठी शिकत असून त्यामध्ये मॅथ्यू चँग नावाचा एक चायनीज-अमेरिकन, जॉन गॉलटन हा लंडनमध्ये पीएचडी करीत असलेला ब्रिटिश विद्यार्थी अशा अनेकांचा समावेश आहे.



झेकोस्लाव्हिया देशातून मार्टिन पुणे विद्यापीठात पीएचडीनंतरचे संशोधन करण्यासाठी सध्या आला आहे. काही महिनेच तो पुण्यात राहणार असला तरी त्याला स्थानिक भाषा शिकण्याची इच्छा होती. कौशिकच्या ब्लॉग आणि व्हिडिओच्या माध्यमातून तो काही महिन्यांत चांगले मराठी बोलू लागला आहे. त्याला अजून प्रगती करायचीय. कौशिक लेले याने अमराठी व्यक्तींना मराठी शिकवण्यासाठी ऑनलाइन ट्युटोरियल्स तयार केल्या आहेत, ज्या त्याच्या पुढील दोन ब्लॉग्सच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत.


http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/
http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/
या ब्लॉगमध्ये लर्न फ्रॉम इंग्लिश या विभागात १३९ धडे आहेत, तर लर्न मराठी फ्रॉम हिंदी या विभागात १०१ धडे आहेत. या ब्लॉगमध्ये देवनागरी लिपी, प्राथमिक व्याकरण (नाम, सर्वनाम, काळ, अव्यय इ. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे शॉर्ट फॉर्म्स इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात, मराठी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ असा हा ब्लॉग आहे. कौशिकने त्याच्या ब्लॉगमधील संभाषणाच्या २०६ साउंड क्लिप्स ही ‘Kaushik Lele’ नावाच्या यूट्यूब चॅनलवर टाकल्या आहेत. ही कौशिक लेलेच्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे.


https://www.youtube.com/c/KaushikLele_Learn_Marathi
फेसबुकवरच्या “Learn Marathi’ नावाच्या ग्रुपवरही कौशिक अतिशय सक्रिय आहे. या ग्रुपवर देश-विदेशातले ९०० हून अधिक सभासद आहेत. मराठी शिकणाऱ्यांच्या प्रश्नांना, शंकांना तिथे तो उत्तरे देतो. त्याने “Marathi Dictionary For Learners’ हे अॅप तयार केले असून ते ‘गुगल प्ले’वर उपलब्ध असल्याचे काैशिक याने सांगितले.


गुजराती भाषेचेही ऑनलाइन धडे
गुजराती भाषा शिकण्यासाठीही ट्युटोरियल्सची कमतरता असल्याचे जाणवले. त्यामुळे मराठीप्रमाणेच कौशिकने इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी ऑनलाइन ट्युटोरियल्स आणि यूट्यूब व्हिडिओ तयार केले आहेत. त्यांच्या लिंक याप्रमाणे आहेत. http://learn-gujarati-from-english.blogspot.in/ http://youtube.com/c/LearnGujaratithroughEnglishwithKaushikLele

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *