👁 11 Views

कोळेगावात मुख्यमंत्री व खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन;फळवणीत रास्ता रोको

कोळेगाव(शाहरुख मुलाणी)

राज्यात शेतकऱ्यांनी आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी १जून पासून संप पुकारला आहे.आज दि ५जून रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन करण्यात आले होते.या बंद मध्ये कोळेगाव ता.माळशिरस येथील शेतकऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन संपात सहभाग नोंदवला.
सकाळी८ वा कोळेगाव बस स्टॅन्ड वर सर्व शेतकरी एकत्र जमले.सकाळपासून रस्त्यावर वाहने अडवण्यास सुरवात केली.जवळपास ३ तास महूद अकलूज रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती.यावेळी शासनाचा निषेधार्थ मुख्यमंत्री फडणवीस व कृषी राज्यमंत्री खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.वेळापूर पोलीस स्टेशनचे सपोनि अविनाश वाडेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
फळवणीत शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन
राज्यात शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी मुंबई कडे जाणाऱ्या सोनाइ दूध उत्पादक संघाचा टँकर फळवणी ता.माळशिरस येथे आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावर सोडून दिला.त्याच बरोबर काकडी व केळी घेऊन जाणारा आयशीर टेम्पो व डाळींब घेऊन जाणारे पिकअप मधील सर्व माल रस्त्यावर टाकण्यात आला.शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे,याची कल्पना असूनही बरेच शेतकरी आपल्या शेतातील माल मार्केटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु ठिकठिकाणी वाहनांमधील भाजीपाला,केळी रस्त्यावर फेकल्यामुळे शेतकर्यांच्याच मागणीसाठी असलेल्या संपला बगल देऊन आपले दूध अथवा इतर माल मार्केट कमिटीकडे पाठवलेल्या शेतकऱ्यांना यामुळे चपराक बसली आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *