सोलापूर, दि. 6 – राज्यातील शेतक-यांच्या आंदोलनाला सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्व स्तरातून पाठिंबा दर्शवला जात आहे. प्रत्येक जण आपल्याला परिने शेतकरी आंदोलनाला समर्थन देत आहेत. कुणी प्रत्यक्षात, तर कुणी सोशल मीडियाच्या आधारे शेतक-यांचे प्रश्न समाजासमोर मांडण्याचे प्रयत्न करत आहेत.
कुसळंब गावात शेतक-यांना पाठिंबा देण्यासाठी लग्नाच्या मंडपातून नव वधू-वराने थेट आंदोलनाचे ठिकाण गाठलं. शेतकरी संघटनेचे युवा राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या नेतृत्वात बार्शी-लातूर व कळंब रस्त्यावरील कुसळंब गावात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शेतक-यांसोबत नव वधूवरही रस्त्यावर उतरुन शेतकरी संपात सहभाग नोंदवला.
यावेळी काँग्रेसचे विक्रांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे आनंद काशिद, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुंदर जगदाळे, आनंद भालेकर, अमोल
जाधव, शिवसेनेचे सचिन नलावडे आदींसह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते





