👁 11 Views

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मोठा निर्णय होणार?

07 जून : राज्य मंत्रीमंडळाच्या कॅबिनेटची आज (बुधवारी) बैठक होणार आहे. त्यात कर्जमाफीवर काही महत्वाचा निर्णय होतोय का याकडेच सगळ्याचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे सांगलीत सातव्या दिवशीही शेतकरी आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनातील आठ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भाजी मंडईमध्ये तीव्र आंदोलन करणार होते मात्र, आंदोलन करायच्या आधीच आंदोलकर्त्यांना घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच आजच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण शेतकरी संपात शिवसेनेनं राजकीय घुसखोरी केल्याने मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत.
दरम्यान, राज्यातल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या मंत्र्यांची एक महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात राज्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन आणि संवाद यात्रे वेळी झालेला जनतेशी संवाद याबाबतचा आढावा घेतला गेला. शेतकऱ्यांनी  पुकारलेल्या संपामध्ये प्रत्येक जिल्ह्यात असलेली परिस्थिती याबाबत विचारणा केली आहे.
केंद्र सरकारच्या योजना गावागावात पोहचवण्यासाठी शेतकरी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यात अनेक मतदार संघातून माहिती आलेली नाही, याबाबत मुख्यमंत्रीनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, 16 जूनपासून केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा 3 दिवस राज्याचा दौरा आहे. याबाबत नियोजन देखील या बैठकीत करण्यात आला आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *