भारतीय लष्कर पाकिस्तानच नाही तर चीनचादेखील सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असा ठाम विश्वास लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली- भारतीय लष्कर पाकिस्तानच नाही तर चीनचादेखील सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असा ठाम विश्वास लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीत लवकरच सुधारणा होईल, असेही सांगितले.
पाकिस्तान, चीन आणि अंतर्गत सुरक्षा अशा तिन्ही पातळ्यांवर लढण्यासाठी भारतीय लष्कर समर्थ असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच पाकिस्तान सोशल मिडियाचा वापर करून देशातील युवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले की, ‘सोशल मीडियाचा वापर करून पाकिस्तान काश्मीरमधील युवकांमध्ये चुकीची माहिती पसवण्याचे काम करत आहे. विविध प्रकारच्या व्हिडिओंमध्ये बदल करून युवकांना भडकवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होत आहे.’ पाकिस्तानच्या या कामात काश्मीरमधील काही लोकांची साथ असल्याचेही ते पुढे म्हणाले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणा-या युवकांचे मोठे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘लष्कर आधुनिकीकरणाची तयारी करत आहे. आम्ही नेहमीच आधुनिकीकरणाचा मुद्दा सरकारसमोर उपस्थित केला आहे. लष्कराचा शस्त्रसाठी अपग्रेड करण्यात आला आहे’, अशी माहिती बिपीन रावत यांनी दिली. ‘आम्ही कमी वापरात येणा-या (30 टक्के) आणि आधुनिक उपकरणे (30 टक्के) यांच्यामधील समतोल राखत आहोत’, असेही त्यांनी सांगितले..
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





