👁 11 Views

फेटरी गावाचा झपाट्याने होतोय् सर्वांगीण विकास

– सरपंच ज्योती राऊत यांनी व्यक्त केला विश्‍वास
– आ. समीर मेघे उर्वरित समस्यांची सोडवणूक करतील
– मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यामुळे गावाची प्रगती
– कॉंग्रेसच्या आंदोलनाविरुद्ध भाजपाचे प्रतिआंदोलन
नागपूर, ८ जून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटरी हे गाव दत्तक घेतल्यामुळेच या गावाची प्रगती झपाट्याने होत असून, या गावाचा सर्वांगीण विकास होत असल्याचा विश्‍वास फेटरी ग्रामपंचायतच्या सरपंच ज्योती भीमराव राऊत यांनी व्यक्त केला. या भागाचे आ. समीर मेघे हे सुद्धा गावातील उर्वरित समस्यांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध असून, त्यांच्या कामावरही गावकर्‍यांचा विश्‍वास आहे, असेही सरपंचांनी म्हटले आहे.
फेटरी गावाचा सर्वांगीण विकास कॉंग्रेस नेत्यांच्या डोळ्यांत सलत असल्यामुळेच की काय, त्यांनी उद्या फेटरीत मुंडन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला जाईल आणि भाजपातर्फे प्रतिआंदोलन केले जाईल, असा निर्धार स्थानिक भाजपा नेत्यांनी केला आहे.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील फेटरी हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. दत्तक गाव फेटरीचा सर्वच क्षेत्रांमध्ये विकास करण्याकरिता व महाराष्ट्रामध्ये फेटरी हे आदर्श गाव म्हणून विकसित करण्याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गावात अनेक विकासकामांना मंजुरी देऊन त्यातील बहुतांश कामांना सुरुवातही करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील सर्वसामान्य नागरिक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामावर आनंदी व समाधानी आहेत. गावातील सर्व समस्या राज्य शासन व आ. समीर मेघे सोडवतील, असा गावातील समस्त नागरिकांना विश्‍वास असून गावकरी मुख्यमंत्री व आ. मेघे यांच्याप्रती आभार व्यक्त करीत आहे, असेही सरपंच राऊत यांनी सांगितले.
सरपंच म्हणून फेटरी गावाच्या सर्वांगीण विकाससाठी मी मुख्यमंत्री व आमदारांना धन्यवाद देते, असे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद करून सरपंच राऊत यांनी गावात सुरू असलेल्या कामांची यादीच दिली आहे, ती अशी-
१) पाणीपुरवठा योजेनेकरिता आमदार निधीतून १३ लाख रुपये, २) आमदार निधीतून अंतर्गत रस्ते बांधकामाकरिता २५ लाख रुपये, ३) जलशुद्धीकरणाकरिता आमदार निधीतून ५ लाख रुपये, ४) मॉयल सीएसआर निधी रस्ता बांधकामाकरिता १० लाख रुपये, ५) सीएसआर निधी वनीकरण संगोपन व सुरक्षा भिंत ९ लाख रुपये, ६) सीएसआर निधी रस्ते बांधकाम व नालीकरण बांधकाम २० लाख रुपये, ७) महाराष्ट्र शासन निधी ३३ केव्ही उपकेंद्र ६.५० कोटी रुपये, ८) मुख्यमंत्री निधी मुख्य रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी दोन कोटी रुपये, ९) महाराष्ट्र शासन निधी पशुवैद्यकीय दवाखाना इमारत निधी १ कोटी १० लाख रुपये, १०) राष्ट्रीय पेयजल योजना निधी १ करोड १० लाख रुपये, ११) सांस्कृतिक भवनाकरिता खा. विकास महात्मे यांचा निधी ५१ लाख, १२) जिप शाळा इमारत बांधकाम निधी ८७ लाख, १३) अंगणवाडी इमारत बांधकाम निधी २५ लाख रुपये, १४) ग्रामपंचायत भवन इमारत बांधकाम निधी १२ लाख रुपये, १५) स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधकाम निधी १० लाख रुपये, १६) शोकसभा मंडप बांधकाम निधी ४ लाख रुपये, १७) जलयुक्त शिवार योजनेतून ९ बंधारे खोलीकरण व दुरुस्ती निधी १६ लाख रुपये, १८) सीएसआर निधीतून कचरा व्यवस्थापन दोन पिकअप गाड्या व इतर खर्चाकरिता १७ लाख रुपये, १९) आरोग्य उपकेंद्र दुरुस्तीकरिता १० लाख रुपये, २०) घनकचरा व्यवस्थापन व बंदिस्त नाली बांधकाम २० लाख, २१) दलित वस्ती सुधार योजनेतून २२ लाख रुपये, २२) आरओएटीएम निधी १३ लाख रुपये, २३) फेटरी गावाकरिता नवीन आबादी वसाहतकरिता पाच एकर जागा हस्तांतरण, २४) एकूण २५ आदिवासी कुटुंबांना मालकी पट्टे वाटप.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *