👁 9 Views

पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात एकदिवसीय कार्यशाळा

पंढरपूर: प्रतिनिधी

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात सोमवार दिनांक ६ मार्च २०२३ रोजी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आले होते. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. राजेश पाटील यांनी दिली.


    सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षात इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाचा  अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 


   या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील २५ हुन अधिक शिक्षक सहभागी झाले होते. यामध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाचा शेवटच्या वर्षाचा अभ्यासक्रम कसा असावा? त्याची रचना व विविध विषयाचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात आला.


   हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. राजेश पाटील, प्रा. विनोद मोरे, प्रा. किशोर जाधव, प्रा. प्रदिप व्यवहारे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *