पिंपरी चिंचवड : बाप दररोज प्रेयसीला शिवीगाळ करायचा म्हणून संतापलेल्या मुलाने बापाला संपवल्याची धक्कादायक घटना दिघी परिसरात उघडकीस आली आहे.
जाधव कुटुंबीय हे दिघी परिसरातील समर्थ सदन इमारतीत राहते. रामदास जाधव हा आपल्या छोटा मुलगा अनिल जाधव याच्या प्रेयसीला शिवीगाळ आणि अपशब्द बोलायचा. यामुळे अनिलचा संताप झाला. संतापाच्या भरात त्याने बापाचा गळा आवळला. मग मोठा भाऊ आणि आईच्या मदतीने मृतदेह फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव केला. मात्र पोलीस तपासात सत्य उघडकीस आले
यानंतर अनिल जाधव याला हत्येप्रकरणी, तर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी राहुल जाधव आणि रामदासची पत्नी यांच्याविरोधात दिघी पोलिसात आई आणि दोन मुलांविरोधात कलम 302, 201 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.



