* सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी *
विविध पक्ष संघटना यांना सहभागी होण्याचे आवाहन
चंद्रभागा नदीच्या पात्रात वाळूमुळे पडलेल्या खड्डयात बुडुन गवळी समाजातील चार बालकांचा मृत्यु झाल्यानंतर गवळी समाजाच्या भावना संतप्त झाल्या आहेत. चंद्रभागा नदीतून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यास असमर्थ ठरलेल्या तहसिलदार व संबधीत कर्मचार्यांना जबाबदार धरुन सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत यासह या घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून त्वतीत प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्यात यावी.या पुढे चंद्रभागेच्या पात्रातील वाळुमुळे पडलेल्या खड्यात कुणाचाही बळी गेला तर त्याची जबाबदारी निश्चिीत करावी.चंद्रभागेत बूडून मरण पावणार्या भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीने विमा उतरवावा. उपजिल्हा रुग्णालयातील बेजबादार कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी.पंढरपूर नगर पालीकेने चंद्रभागा नदीच्या वाळवंटात जीवन रक्षक कर्मचार्यांची नियुक्ती करावी.यासह विविध मागण्यांसाठी गवळी समाजाच्या वतीने बुधवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.
कालच्या दु:खद घटनेनंतर येथील गवळी समाजाच्या मठात समाज बंाधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत वरील विविध विषयावर चर्चा होऊन आपल्या भावना सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी मोर्चाद्वारे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.याच दिवशी राज्यभरातील गवळी समाज बांधव आपआपल्या ठिकाणच्या तहसिल कार्यालयात निवेदने देणार असून पंढरपूर गवळी समाजाने मोर्चाद्वारे दिलेल्या निवेदनातील मागण्यास पाठींबा दर्शविणार आहेत.या बैठकीस पंढरपूर शहर व तालुक्यातील गवळी समाज बांधव मोठया संख्येन उपस्थित होते अशी माहीती राजाभाऊ शहापूरकर यांनी दिली आहे.





