👁 11 Views

विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरत नारळ फोडणेस मनाई

Pandharpur Live 14 jun 2017

सोलापूर दि. 14 : – पंढरपूर शहरात 28 जून 2017 ते 9 जुलै 2017 या कालावधीत आषाढी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांकडून नामदेव पायरी व परिसरात नारळ फोडण्याने या ठिकाणी नारळाच्या पाण्याने चिखल होण्याची शक्यता आहे.  नारळ फोडणे व नारळाच्या साली मुळे या भागात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी  पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी  विजय देशमुख यांनी  विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये  मंदिर परिसरात नारळ विक्री करणे आणि नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.  हे आदेश 28 जून 2017 रोजी सायंकाळी 18 वाजलेपासून ते दिनांक 9 जुलै 2017 रोजीच्या सायंकाळी 18 वाजेपर्यंत लागू राहतील असेही उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी  विजय देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे.





सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *