👁 13 Views

भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार : मुख्यमंत्री

मुंबई : भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार आहे, असं सूचक विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्यावर आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करुन शिवसेनेसह विरोधकांना इशाराच दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की,
“शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असताना काही जण सरकार पाडण्याची,
पाठिंबा काढण्याची भाषा करत होते. प
ण आम्ही मध्यावधी निवडणुकांसाठी तयार असल्याचं मी सांगितलं.”
जर कोणाला सत्तेतील पाठिंबा काढून मध्यावधी निवडणुका घ्यायच्या असतील तर घ्याव्यात. निवडणुकांनंतर आम्हीच सत्ता स्थापन करु, असा माझा विश्वास आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पक्षाचं नाव न घेता इशारा दिला.
राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीतील कामगिरी पाहता जनता भाजपलाचा कौल देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना आहे.
“हे यश अभूतपूर्व आहे. कोणत्याही पक्षाला असं यश मिळालं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीलाही त्यांच्या कार्यकाळात हे यश मिळवता आलं नाही. यावरुन जनतेचा सरकारवर विश्वास असल्याचं दिसतं,”असंही मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *