लातूर : लातूरमधल्या शामनगर भागात रात्री आणखी एका अनधिकृत कॉलसेंटरवर लातूर एटीएसनं छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी 38 सिमकार्ड आणि एक गेटवे मशीन ताब्यात घेतलं. तर याप्रकरणी लातूर पोलिसांनी हैदराबादेतल्या कुलबाग परिसरातून दोघांना अटक केली.
दोनच दिवसांपूर्वी लातूर पोलिसांनी अनधिकृत एसटीडी/आयएसडी सेंटरचा पर्दाफाश केला होता. या कॉल सेंटरच्या माध्यमातून सरकारला 16 कोटींचा चुना लावल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी लातूर पोलिसांनी दोघांना अटक केली होती.
या प्रकरणी लातूर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शंकर बिरादारचा कारनामा समजल्यानंतर, पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. कारण या पठ्ठ्यानं घरात चक्क अवैध टेलिफोन एक्सचेंज सुरु केलं होतं. या टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीनं चोरी छुपे आंतरराष्ट्रीय कॉल्स केले जायचे.
तर काल आणखी एका कॉलसेंटरचा लातूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लातूर एटीएसने शामनगर येथील अनधिकृत कॉलसेंटरवर छापा टाकाला. यावेळी तिथून 38 सिमकार्ड आणि एक गेटवे मशीन पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. हे अनाधिकृत कॉलसेंटर केरबवाले नावाचा व्यक्ती चालवत असल्याची माहिती मिळाली असून, लातूर एटीएसच्या कारवाईनंतर तो फरार झाला आहे.
दरम्यान, राज्यात अवैध कॉलसेंटरची टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना असून, याचा राज्यात अनेक ठिकाणी तपास सुरु आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



