सोलापूर: पल्स इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या खातेदारांच्या त्रासाला कंटाळून सोलापूरमधील पल्सच्या एका एजंटने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोलापुरातील माळशिरस तालुक्यात ही घटना घडली असून राजकुमार पांडुरंग बाबर असं या एजंटचं नाव आहे.

गेली १६ वर्षे राजकुमार बाबर पल्स इंडियाचे काम करीत होते. त्यांच्यामार्फत खातेदारांनी जवळपास १ कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीमध्ये केली होती. मात्र, कंपनीकडून पैसे परत न मिळाल्याने खातेदारांनी या पैशासाठी बाबर यांच्याकडे तगादा लावला होता.
कंपनीच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांनी हात झटकल्याने बाबर खूपच निराश झाले होते. यातच पैशासाठी वारंवार येणाऱ्या फोनमुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या बाबर यांनी काल आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



