पंढरपूर LIVE , प्रतिनिधी
काल दिनांक १८/०६/२०१७ रोजी बळीराजा प्रतिष्ठानच्या वतीने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर, विस्तार अधिकारी रणदिवे सर, सप्तशृंगी पतसंस्थेचे सचिव मा.अमोल (काका) चव्हाण साहेब, साहित्यिक रवी सोनार साहेब, सरपंच रमेश गाजरे साहेब, कृती समितीचे राजेश पवार सर,रघुनाथ ताठे देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी आमदार सावंत सर,रणदिवे सर,राजेश पवार सर,रवी सोनार साहेब यांनी मनोगतातून बळीराजा प्रतिष्ठानचे मनोबल वाढवले. आज गरीब पोरांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होते. नवीन दप्तर बघून त्यांचा आनंद गगणात मावत नव्हता. या मुलांच्या शालेय साहित्यासाठी अजयमोहन शिंदे साहेब,अमोलजी चव्हाण साहेब,संदेशजी बांदेकर सर,बिरुदेवजी बुरंगे साहेब,संदीप नालंदवार साहेब यांनी आर्थिक मदत केली. बाकीची आर्थिक मदत बळीराजा प्रतिष्ठानच्या टीमने उभा केली. आज साऱ्यांच्याच चेहऱ्यावर समाधान होते.
राजू इनामदार सर यांनी मनोगत व्यक्त करून बळीराजाच्या टीममध्ये उत्साह भरला.
अंकुश गाजरे यांनी प्रास्ताविक केले. कवी गणेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले,
प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाशजी गाजरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाची घडी बसवली ती आप्पासो गाजरे, रमजान मुलाणी सर,संग्रामजी शिकारे,आशपाक जी देवळे सर यांनी…
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





