क्रमश :
एक्यूयोगा
९) शारीरिक हालचालीचे आजार
१. कंबर दुखीसाठी:
कंबर दुखत असेल तर गव्हर्निंग व्हेसलच एक्यूयोगा, मूत्राशयाचा, स्प्लिनचा, एक्यूयोगा करावा.
एक्यूयोगा मधील क्रिया क्रमांक २७ कमरेचे ट्रॅक्शन घयावे.
अ) जमिनीवर उताणे झोपावे पाय गुडघ्यात मुडपून पायाचे पंजे भीतीला लावावे. हात जमिनीवर ठेवावे. हातावर दाब देऊन कंबर वर घेताना श्वास घ्यावा कंबर खाली घेत श्वास सोडावा. हि क्रिया क्षमतेनुसार ५ ते १५ वेळा करावी. यामुळे कमरेच्या माणक्यावरील दाब कमी होतो व कंबरदुखी थांबते.
ब) जमिनीवर उताणे झोपावे. दोन्ही पाय सरळ गुडघ्यात न वाकवता कमरेपासून वर सरळ करावे. हे अर्ध हलासन आहे. हे १० सेकंद ते १ मिनिट क्षमतेनुसार करावे. ह्यामुळे कमरेचे मणके जमिनीला लागतात व त्यांना अराम मिळतो.
क) पवन मुक्तासनात डाव्या आणि उजव्या बाजूस रोलिंग करावे, नंतर पुढे व मागे रोलिंग करावे.
ड) एक्यूयोगातील क्रिया क्रमांक २९ करावी.
इ) मेडिसिन बॉल ५ ते ७ व्यासाचा कमरेखाली घेऊन कमर डावीकडे आणि उजवीकडे हलवावी.





