दिंडीत सहभागी झालेल्या ‘मराठी तारका’, सोबत दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर
पुणेः टाळ-मृदुंगाचा पंढरीच्या वारीत नाद घुमू लागला आहे. विठुरायाच्या भेटीला आतूर झालेले वारकरी आता पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. सोमवारी वारी पुण्याला मुक्कामाला होती. मंगळवारी सकाळी वारी पुढच्या प्रवासाला निघाली असताना ‘मराठी तारका’ दिंडीत सहभागी झाल्या.
अभिनेत्री स्मिता शेवाळे, तेजा देवकर, संस्कृती बालगुडे आणि भार्गवी चिरमुले या मराठी तारका वारक-यांमध्ये सहभागी झाल्या आणि टाळ-मृदुंगाच्या साथीने त्यांनी विठू रायाचा गजर केला. यावेळी निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर हेसुद्धा त्यांच्यासोबत होते.
महेश टिळेकर यांची निर्मिती संकल्पना असलेल्या `मराठी तारका` या नृत्य-संगीत कार्यक्रमात या चारही अभिनेत्रींचा समावेश आहे. या पाचही जणांनी वारक-यांसोबत जय हरी विठ्ठलचा गजर केला.
पुढील स्लाईड्सवर बघा, विठू रायाच्या गजरात तल्लीन झालेल्या मराठी तारका…
अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने विठू नामाच्या गजरात तल्लीन झाली.








