सोलापूर, दि.10 – राज्यात शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी सरकारने आदेशदिले आहेत. मात्र, काही बॅंका कर्ज देताना असहकार्याची भूमिका घेत आहेत. या कर्जाला शासन तारण असल्याने बॅंकांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सरकारने सांगितल्यानंतरही काही बॅंकांनी असहकार्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. अशा बॅंकांवर ठोस कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.
शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर 10 हजारांचे अग्रीम कर्ज मंजूर करण्याबाबत सोलापूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी असमर्थता दर्शवली होती. त्यावर बोलताना देशमुख यांनी ही प्रतिक्रीया दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



