👁 8 Views

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात सहभागाची संधी ‘सर्वांना परवडणारी घरे’ या विषयावर 27 जूनपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन


मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात सहभागाची संधी
सर्वांना परवडणारी घरे या विषयावर
27 जूनपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन
मुंबईदि. 22 दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम यावेळी  सर्वांना परवडणारी घरे  या विषयावर होणार असून या कार्यक्रमासाठी  दि. 27 जून 2017 पर्यंत प्रश्न पाठवावेत,  असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
प्रश्न पाठवून थेट या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी राज्यातील जनतेला उपलब्ध होणार असून हे प्रश्न त्यांना mmb.dgipr@gmail.com या ई-मेल वर तसेच 8291528952 या क्रमांकावर व्हॉटसॲपद्वारे रेकॉर्डिंग करून किंवा संदेश स्वरूपात पाठवता येतीलसोबत आपले छायाचित्र ही पाठवता येऊ शकेल.
सर्वांना परवडणारी घरे या विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात महारेरा, म्हाडा, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, शहरांचा विकास आराखडा, झोपडपट्टी पुनर्विकास योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आदी सारखे विविध विषय समाविष्ट असतील.
या कार्यक्रमात नगर विकास, गृहनिर्माण, ग्राम विकास विभाग तसेच, सिडको,महारेरा, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण सारख्या प्राधिकरणांचा समावेश असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *