👁 12 Views

विश्वस्त संस्थानी सामाजिक उपक्रमात पुढे यावे …. न्यायमूर्ती पी. डी. नाईक





पंढरपूर दि. 24 :   विश्वस्त संस्थानी  आरोग्य, शिक्षण, धार्मिक उपक्रमाबरोबरच सामाजिक विधायक उपक्रम राबविण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि धर्मादाय संघटना पालक न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केले.

            धर्मादाय आयुक्त कार्यालय, सोलापूर आणि विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  अभियांत्रिकी महाविद्यालय, गोपाळपूर येथे आयोजित केलेल्या विश्वस्तांची कार्यशाळा व संगणकीकृत प्रशासनाची ओळख कार्यक्रमात न्यायमुर्ती पी. डी. नाईक बोलत होते. यावेळी  धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे, धर्मादाय उप आयुक्त प्रदीप चौधरी, धर्मादाय उपायुक्त श्री. व्यास, बी.पी. रोंगे यांच्यासह धर्मादाय संस्थाचे विश्वस्त, धर्मादाय कार्यालयातील अधिकारी आणि महाविद्यलायाचे प्राद्यापक व विद्यार्थी  उपस्थित होते.

            न्यायमूर्ती श्री. नाईक म्हणाले, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने विश्वस्त संस्थासाठी सुरु केलेल्या संगणकीकृत प्रशासन कार्यक्रम विश्वस्त संस्थासाठी स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाचा लाभ संस्थानी करुन घेतल्यास भविष्यात त्यांना कोणत्याही अडचणींचा त्रास होणार नाही. विश्वस्त संस्थानी काळानुरुप बदल स्वीकारणे गरज  आहे. विश्वस्त संस्था अनेक चांगले उपक्रम राबवित असतात. या संस्थानी कायद्याच्या चौकटीत राहून सर्व कामकाज करावे, अशी अपेक्षाही न्यायमूर्ती श्री. नाईक यांनी  व्यक्त केली.

            धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे म्हणाले, विश्वस्त संस्था सेवा देण्याच्या कामात नेहमी पुढे असताता. याबरोबरच पारदर्शकता आणि बांधिलकीसाठी काम होणे गरजचे आहे. यासाठी धर्मादाय आयुक्त  कार्यालयाने सुरु केलेल्या ऑन लाईन प्रशासन या उपक्रमाचा लाभ घेऊन आपली संस्था ऑन लाईन करुन घ्यावी.  संस्थेचे कामकाज पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी ऑन लाईन होणे महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले. धर्मादाय आयुक्त कार्यालय मार्गदर्शकाचे काम करत असून, जिल्ह्यातील सर्व विश्वस्त संस्थानी ऑन लाईन नोंदणी उपक्रमात सहभाग घ्यावा. धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत भविष्यात तंटामुक्त विश्वस्त संस्था उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
            यावेळी प्राचार्य बी. पी. रोंगे यांनीही मनोगत व्यक्त केले.  धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.


 आरोग्य शिबीर रुग्णालयासाठी घेण्यात आलेल्या रुग्णालयांच्या सेवा-  दिनांक 27 जून 2017 रोजी दुपारी 2 ते रात्रौ 10 पर्यंत जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी, रात्रौ 10 ते सकाळी  8 पर्यंत विठ्ठल हॉस्पिटल, पंढरपूर, दिनांक 28 जून 2017 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी, दुपारी 2 ते रात्रौ 10 पर्यंत अल-फैज जनरल हॉस्पिटल, सोलापूर, रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर. दिनांक 29 जून 2017 रोजी  सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत कासलीवाल हॉस्पिटल,सोलापूर दुपारी 2 ते रात्रौ 10 पर्यंत युगंधर हॉस्पिटल, सोलापूर, रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत विठ्ठल हॉस्पिटल, पंढरपूर दिनांक 30 जून 2017  सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर, दुपारी 2 ते रात्रौ 10 पर्यंत सेठ सखाराम नेमचंद रुग्णालय, सोलापूर, रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर. दिनांक 1 जुलै 2017 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत सेठ सखाराम नेमचंद रुग्णालय, सोलापूर, दपुारी 2 ते रात्रौ 10 पर्यंत अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी,  रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत विठ्ठल हॉस्पिटल, पंढरपूर. दिनांक 2 जुलै 2017 पर्यंत सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर, दुनपारी 2 ते रात्रौ 10 पर्यंत गांधीनाथा रंगजी हॉस्पिटल, सोलापूर, रात्रौ 10 ते सकाळी 8 जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर. दिनांक 3 जुलै 2017 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत  मल्लवाबाई वल्याळ डेंटल हॉस्पिटल, सोलापूर,नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी, आणि गांधीनाथा रंगजी हॉस्पिटल, सोलापूर. दुपारी 2 ते रात्रौ 10 पर्यंत जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी, रात्रौ. 10 ते सकाळी 8 पर्यंत विठ्ठल हॉस्पिटल, पंढरपूर दिनांक 4 जुलै 2017 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत फत्तेचंद दमाणी नेत्रालय, सोलापूर, अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी, सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल, सोलापूर, दुपारी 2 ते रात्रौ 10 पर्यंत सेठ सखाराम नेमचंद रुग्णालय, सोलापूर, एस्एम्एस् मोहिते पाटील ब्लड बँक, अकलूज, रात्रौ. 10 ते सकाळी 2 पर्यंत जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर, केगांव डेंटल हॉस्पिटल, सोलापूर आणि दिनांक 5 जुलै 2017 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर, दुपारी 2 ते रात्रौ 10 पर्यंत अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी व रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत विठ्ठल हॉस्पिटल, पंढरपूर या रुग्णालयामार्फत वारकरी भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *