👁 12 Views

वाखरी पालखीतळावर भाविकांना पाणी पुरवठा करण्यासाठी न.पा.पाणी पुरवठा विभाग सज्ज 7 लाख लिटर क्षमतेच्या हौदाची युध्दपातळीवर साफसफाई

                                  
  
                       

आषाढी यात्रेसाठी देहू-आळंदी तसेच विविध ठिकाणाहून निघालेला दिंडी सोहळा लवकरच सोलापूर जिल्हयात  दाखल होत असून पंढरीत येणार्‍या भाविकांना शुध्द पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी नगर पालीका पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे.आवश्यक तेथे देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत.वाखरी पालखी तळावर पालखी मुक्कामाच्या वेळी जवळपास तीन लाख भाविक मुक्कामास असतात.या ठिकाणी भाविकांना पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी नगर पालीकेच्या वतीने सात लाख लिटर क्षमतेचा पाण्याचा हौद बांधण्यात आला असून या हौदाच्या साफसफाईचे काम युध्दपातळीवर करण्यात येत आहे.

          या बाबत अधिक माहीती देताना नगर पालीका पाणी पुरवठा समितीचे सभापती विक्रम शिरसट म्हणाले की,यात्रा कालावधीत पंढरपूरात येणार्‍या भाविकांची प्रचंड संख्या लक्षात घेता नगर  पालीका पाणी पुरवठा विभागाने शहरातील विविध ठिकाण्याचा पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनच्या दुरुस्तीची व टाक्यांच्या साफसफाईचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे.वाखरी पालखी तळावर यात्रा कालावधीत पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगर पालीका पाणी पुरवठा विभाग प्रतवर्षी सक्षमपणे पार पाडत आला आहे.वाखरी पालखी तळावर भाविंकाच्या सोईसाठी मोठया प्रमाणात तात्पुरते नळ उभारले आहेत.वाखरी पालखी तळावर आषाढ शुध्द अष्टमी व नवमी रोजी मुक्कामी आलेल्या दिंडी सोहळयातील भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे अशी माहती विक्रम शिरसट यांनी दिली आहे.  
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *