बीड- जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामग्रह बीड येथे बीड जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे *संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हाकदार* यांच्या आदेशानुसार *जिल्हाध्यक्ष अंगद मोहिते* यांच्या मार्गदर्शना खाली व *दैनिक कार्यरंभच्या उपसंपादिका सोनाली ताई शहाणे* व *दैनिक पुढारी चे जिल्हाप्रतिनिधि उत्तम हजारे* यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील पत्रकारांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन *निलेश चाळक* यांनी केले आहे
बीड जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाची बैठक दि.30 जून रोजी दुपारी 12:30 वाजता शासकीय विश्राम ग्रह बीड येथे आयोजित करण्यात आली आहे
या बैठकीत ग्रामीण भागातील पत्रकारांना येणाऱ्या विविध अडचणी विषयी महत्वपूर्ण विषयावर बैठकीत चर्चा होणार आहे तसेच ग्रामीण पत्रकारांना येणाऱ्या अडचणी कश्या सोडवाव्यात यासाठी *संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हाकदार ,प्रमुख पाहुणे सोनाली ताई शहाणे ,उत्तम हजारे ,अंगद मोहिते* आपले विचार मांडणार् आहेत तरी बैठकीस जास्तीत जास्त ग्रामीण भागातील पत्रकारांनी आपली उपस्थिति दर्शवावी असे आवाहन संघाच्या वतीने *निलेश चाळक* यांनी केले आहे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



