👁 13 Views

सदगुरू दादा महाराज चातुर्मास्ये संस्थानचा दिंडी सोहळा पंढरीत दाखल

भुवैकुंठ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी लाखो भाविकांची मंदियाळी जमते.असंख्य दिंड्या पंढरीत येतात.यामध्ये पंढरीत नांदणार्या काही निष्ठावान परंपरेचे पालखी सोहळे सुध्दा आपआपल्या मुळ स्थानापासुन ते पंढरी च्या दिशेने परंपरेने मार्गक्रमण करतात.या पैकीच तिनशे वर्षापासुन वारकरी सम्प्रदायात सेवा करणारी परंपरा म्हणजे चातुर्मास्ये महाराज परंपरा…!!
उज्वल परंपरा असणार्या या संस्थानचा ही दिंडी सोहळा श्रीक्षेत्र आनवा जि.जालना येथुन थाटामाटात प्रस्थान करित असतो.यावर्षी श्रीसंस्थानचा दिंडी सोहळा सोहळा तब्बल तेविस दिवस प्रवास करुन पंढरीत काल रोजी दाखल झाला.या सोहळ्यासोबत एकुण सातशे-आठशे भाविक पंढरीत दाखल झाले.पंढरपूरात दाखल झाल्यावर अनेक स्रीयांनी औक्षण करुन या सोहळ्याचे स्वागत केले..
मानाच्या परंपरेच्या दिंड्यांपैकी पंढरीत दाखल होणारी ही पहिलीच दिंडी आहे.
हा सोहळा संस्थानचे श्री.कैवल्य महाराज चातुर्मास्ये व पराग महाराज चातुर्मास्ये यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पुर्ण प्रवास करीत पंढरीत आला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *