👁 11 Views

विठ्ठलाचा पोशाख शिवण्याची निकते घराण्याकडे शेकडो वर्षांची परंपरा

लाडक्या विठुरायाचे लोभस रूप डोळ्यात साठवण्यासाठी शेकडो मल चालत वारकरी दरवर्षी येतात.

विठ्ठलाचा पोशाख बनविताना राजेंद्र निकते. 

लाडक्या विठुरायाचे लोभस रूप डोळ्यात साठवण्यासाठी शेकडो मल चालत वारकरी दरवर्षी येतात. या विठुरायाच्या अंगावर दिसणारा पोशाख आपण पाहतो. त्या पोशाखालाही शेकडो वर्षांची परंपरा आहे. संत नामदेव महाराजांनी सावळ्या विठुरायाला पोशाख बनवून दिला होता. ही परंपरा पंढरपुरात आजही निकते घराण्याकडून चालवली जाते. गंमत अशी, की कसलेही मोजमाप किंवा टेप न लावता पंढरपुरातील हे घराणे हे काम आजतागायत करत आहे.
संत नामदेव हे िशपी समाजाचे विठ्ठलाचे निस्सीम भक्त. संत नामदेवांनी पांडुरंगाला पोशाख शिवून दिल्याचा वारकरी सांप्रदात उल्लेख आहे. ही परंपरा आजही जपली जात आहे. पंढरपुरात विठुरायाला पोशाख बनवण्याचे काम निकते घराण्याकडे आहे. या घराण्यातील राजेंद्र निकते यांनी यंदाचा विठुरायाचा पोषाख शिवला आहे.
पांडुरंगाच्या या पोशाखाला पूर्वी बाराकाशी असे म्हणायचे. पुढे बारा-बंदी, अंगरखा म्हणून ओळखला जातो. देवाचे कपडे शिवण्याची कला वंशपरंपरेने सुरू आहे. यासाठी पूर्वी खास रेशमाचे कापड वापरले जात होते. आता मखमल, वेलवेट यांसारखे कापड वापरले जाते. बारा ठिकाणी बंद असलेला हा अंगारखा बनवताना टेप न लावता अंदाजे शिवला जातो. विठ्ठला बरोबर इतर देवांचे पोशाखही हेच घराणे तयार करते. त्याचबरोबर देवाच्या डोक्यावर असलेली पगडी देखील बनवण्याचे काम इथे केले जाते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *