👁 9 Views

Viral : जोक्स आणि मिमनंतर आता सोशल मीडियावर जीएसटीच्या बिलांचा पाऊस

जीएसटी बिल शेअर कऱण्याचा ट्रेंड


केंद्र सरकारने १ जुलैपासून वस्तू व सेवा करप्रणाली लागू केली. सोशल मिडियावर याविषयी मागच्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा चालू आहे. याविषयीचे जोक्स आणि मिम यांनाही उधाण आले आहे. तुमच्या हास्यावर जीएसटी ० टक्के आहे तेव्हा भरपूर हसा यांपासून ते जीएसटीचा लॉंगफॉर्म Good Night Sweet Dreams and take Care असा आहे असे असंख्य जोक्स फिरत आहेत. मात्र आता प्रत्यक्षात जीएसटी लागू झाला असून ग्राहक दुकानातील खरेदीची बिले, हॉटेलमधील बिले आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवरुन शेअर करत आहेत. ‘माझे पहिले जीएसटी बिल’ असे म्हणून या पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

पंतप्रधान यांनी आपल्या जीएसटीवरील भाषणात जीएसटी म्हणजे Good and Simple Tax असे म्हटले होते. मात्र सामान्यांसाठी ते सोपे नसल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. ट्वीटर अकाऊंटवर ग्राहकांनी शेअर केलेल्या अशा बिलांचा पाऊस पडच्याचे पहायला मिळत आहे. अनेकांनी या वाढलेल्या बिलांना शेअर करत आपला संतापही व्यक्त केला आहे. मॅकडोनल्स, केएफसी यांसारख्या ब्रॅंडबरोबरच पुण्यातील वैशालीची कॉफी किंवा अगदी एखादे हॉटेल आणि स्नॅक्स सेंटर्समधीले बिलेही यामध्ये जोडण्यात आली आहेत. याशिवाय अनेकांनी आपली जीएसटी या नव्या करप्रणालीबाबतची मते सोशल मिडियावर व्यक्त केली आहेत.
याशिवाय काही दुकानांनी अजूनही जीएसटी पद्धत लागू केलेली नसून ते जुन्याच कर पद्धतीने आपला कारभार करत असल्याचेही म्हटले आहे. मात्र बाहेर खाण्याचा शौक असणाऱ्यांसाठी जीएसटी अतिशय वाईट गोष्ट असून त्यामुळे खिशाला चांगलाच भुर्दंड पडणार असल्याचे मत तरुणांनी व्यक्त केले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *