मुंबई : ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कैवल्य अर्थात अमेय वाघ त्याची मैत्रीण साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलाय. पुण्याच्या श्रुतिमंगल कार्यालयात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला
अमेयच्या लग्नात मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेता, अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. दिल दोस्ती दुनियादारी मालिकेची संपूर्ण टीमही अमेयच्या लग्नात उपस्थित होती.
गेल्याच महिन्यात अमेयची प्रमुख भूमिका असलेला मुरांबा हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. काही दिवसांपूर्वीच अमेयने सोशल मीडियावर तो आणि साजिरी नव्या नात्यात अडकणार असल्याचे सांगितले होते.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




