👁 10 Views

देहूरोड येथे पाच जणांच्या टोळक्याकडून तरुणावर वार

पूर्ववैमनस्यातून पाच जणांच्या सशस्त्र टोळक्याने दुचाकीवरून जाणार्‍या तरूणावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. आंबेडकर नगर येथे गांधीनगर रस्त्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रकार घडला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. जखमी तरूणावर खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
रोहित उत्तम अलकोंडे असे गंभीर तरूणाचे नाव आहे. त्याच्या डोक्यावर, खांद्यावर, उजव्या हाताच्या पंजावर गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी प्रशांत उर्फ शिंगर्‍या राजू पवार, भावड्या चव्हाण, वाढी, तंबी (पूर्ण नावे समजू शकली नाहीत) व अन्य एकजणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रोहित गांधीनगर येथील आपल्या घरून बाजारपेठेकडे येत असताना आंबेडकर नगर येथे रस्त्यात अडवून अचानक त्याच्यावर या पाच जणांनी हल्ला चढवला. दरम्यान, रोहित हा व्यवसायिक असून यापुर्वी त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले. हल्लेखोर दोन दुचाकीवरून आले होते. घटनेनंतर ते पसार झाले. 
घटनेनंतर या भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देहूरोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत माडगुळकर, पोलिस निरीक्षक अरूण मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. शहरात रविवारी घडलेल्या तोडफोडीची घटना ताजी असताना दिवसाढवळ्या हा प्रकार घडला. शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


  

















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *