👁 10 Views

जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील नाट्यगृहाचे लोकार्पण





अलिबागदि.: राज्यातील कलावंतांना चांगलेहक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे राज्यकर्ते म्हणून आमचे कर्तव्य आहे. म्हणुनच राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करतांना जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करुन  राज्याची सांस्कृतिक संपदा जोपासणारअशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
अलिबाग शहरात पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ या संस्थेने सहकारी तत्वावर उभारलेल्या राज्यातील  पहिल्या नाट्यगृहाचे लोकार्पण श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणसांस्कृतिक कार्य व क्रीडा मंत्री विनोद तावडे,जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरेआमदार सर्वश्री जयंत पाटील,सुनिल तटकरेसुभाष उर्फ पंडितशेट पाटीलधैर्यशील पाटीलबाळाराम पाटीलश्रीमती मिनाक्षीताई पाटीलजि.प. उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटीलनगराध्यक्ष प्रशांत नाईकश्रीमती नलिनीपीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील तसेच जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेरकोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाजपोलीस अधीक्षक अनिल पारसकर तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे कळ दाबून ॲड. नाना लिमये रंगमंचाचा पडदा उघडण्यात आला. त्यानंतर अलिबाग येथील नमन नृत्य संस्थेच्या कलावंतांनी नांदीनृत्य सादर करुन या नाट्यगृहाचे उद्घाटन झाले. त्यानंतर श्री. पाटील यांचा श्री. फडणवीस यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करुन अभिष्टचिंतन करण्यात आले.
श्री. फडणवीस म्हणाले कीअलिबाग येथे अत्यंत चांगले नाट्यगृह उभे राहिले आहे. सुंदर आणि सुसज्ज नाट्यगृह सहकार क्षेत्रामार्फत सुरू झाले, हे काम चांगले आहेम्हणूनच अशा चांगल्या कामांच्या पाठीशी सरकार उभे आहे. राज्यात कलेचे क्षेत्र रुंदावत आहे. असे असतांना विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी राज्यात चांगल्या नाट्यगृहांची आवश्यकता आहे. नाट्यकला ही राज्याची सांस्कृतिक संपदा आहे. ही संपदा जोपासण्यासाठी राज्यात नवी नाट्यगृहे उभारण्यासाठी चालना देतांनाच जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करण्यासही शासनाचे प्राधान्य असेलअसे श्री. फडणवीस यांनी सांगितले. त्याच प्रमाणे सिनेरसिकांना दर्जेदार सिनेमे पाहता यावे यासाठी थिएटर उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेअसेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना श्री. फडणवीस म्हणाले कीजयंत पाटील यांनी हाती घेतलेले काम उत्तम करण्याचा प्रयत्न असतो,राजकारणाच्या पलिकडले संबंध जपणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे नेतृत्व हे संघर्षशीलआत्मविश्वासपूर्ण आणि उत्तमतेचा ध्यास असलेले नेतृत्व आहेअशा शब्दात श्री. फडणवीस यांनी श्री. पाटील यांचा गौरव केला. तसेच अलिबाग येथे खुले नाट्यगृह उभारण्यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासनही श्री. फडणवीस यांनी यावेळी बोलतांना दिले.

  















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *