👁 10 Views

मंदिर समिती निवडीसंदर्भात माऊलींना थांबवता… चंंद्रभागा पात्राच्या पावित्र्यासाठी वारकरी सांप्रदाय आवाज का उठवत नाही?-गणेश अंकुशराव

मंदिर समिती निवडीसंदर्भात माऊलींना थांबवता…
चंंद्रभागा पात्राच्या पावित्र्यासाठी वारकरी सांप्रदाय आवाज का उठवत नाही?-गणेश अंकुशराव

पंढरपूर (प्रतिनिधी):-  मंदिर समिती निवडीसंदर्भात विठोबाच्या भेटीस आतुर झालेल्या माऊलींना व वारकर्‍यांना थांबवता… मग चंद्रभागेच्या पात्रातील पावित्र्य जपण्यासाठी मुग गिळून गप्प का बसता..? तथाकथीत वारकरी सांप्रदायातील ‘सुज्ञ महाराज’ मंडळींना आमचा हा खडा सवाल आहे. नुकताच आषाढी यात्रेचा सोहळा पंढरीत सपन्न झाला. मात्र या वर्षी प्रथमच संत ज्ञानोबांच्या पालखीला विठोबाच्या भेटीसाठी जाताना येथील सरगम चौकात थांबवण्याचे ‘पाप़’ वारकरी सांप्रदायातील कांही महाराज मंडळींनी केले. पंढरीतील चंद्रभागेचे पात्राचे पावित्र्य धोक्यात आलेले असताना या संदर्भात आजतागायत कधीच कोणते आंदोलन न करणार्‍या ‘या’ महाराज मंडळींना राजकारण्यांची लागण झालेली दिसते..! 
‘चंद्रभागे स्नान तुका मागे हेचि दान। आणिक दुजे कांही न मागो देवा॥ या संतवचना नुसार वारकरी सांप्रदायाची परंपरा अनेक साधुसंतांनी व येथे येणार्‍या लाखो वारकर्‍यांनी जोपासलेली आहे. परंतु मोठया खेदाने म्हणावे लागत आहे की, ‘‘सध्या वारकरी सांप्रदायामध्ये राजकारण करणार्‍या कांही महाराज मंडळींनी वारकर्‍यांच्या व संतांच्या या महान परंपरेला गालबोट लागेल असे कृत्य करण्याचे कुकर्म सुरु केले आहे. आळंदी पासुन चालत येणारे लाखो वारकरी सुध्दा नक्कीच या प्रकारामुळे दु:खी झाले असतील असा आम्हाला ठाम विश्‍वास आहे. वारकर्‍यांनी व वारकरी सांप्रदायातील महाराज मंडळींनी पंढरीतील स्वच्छता, सोयी, सुविधा व चंद्रभागेचे पावित्र्य जपणे या प्रश्‍नावर शासनाशी भांडणे योग्य आहे. परंतु शासनाने वारकर्‍यांच्या सुविधेसाठीच अभ्यासपुर्वक व पुढील नियोजन करुन नेमलेल्या मंदिर समितीला कांही महाराज मंडळींनी विरोध करणे आम्हाला रुचलेले नाही. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो..! अशी भावना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
वारकरी सांप्रदायातील या कांही महाराज मंडळींना आमची कळकळीची विनंती आहे की, तुम्हाला शासनाशी भांडायचेच असेल तर वारकरी सांप्रदायात अत्यंत पवित्र मानल्या जाणार्‍या व भक्त पुंडलिकांचे व अनेक साधुसंतांचे वास्तव्य असलेल्या चंद्रभागेच्या पावित्र्यासंदर्भात भांडा..! 

चंद्रभागेच्या पात्रात मिसळणारे मैलामिश्रीत व मटणमिश्रीत पाणी थांबवणे गरजेचे आहे. चंद्रभागेच्या पाण्यावर तरंगणारे शेवाळे व घाणीचे साम्राज्य, चंद्रभागेत होणारी वाळुचोरी व त्यामुळे येथील अनेक साधु संतांची समाधी स्थाने धोक्यात आलेली आहेत. वाळवंटात सर्वत्र पसरलेले प्रचंड घाणीचे साम्राज्य. अशा अनेक प्रश्‍नांमुळे चंद्रभागेचे पावित्र्यच नष्ट झालेले असल्याचे चित्र आहे. या सर्व मुद्दयांसाठी जर महाराज मंडळींनी पंढरीत येणार्‍या माऊलीला थांबवले असते तर त्याचे स्वागत आम्ही नक्कीच केले असते. परंतु केवळ मंदिर समितीचे अध्यक्षपद आम्हाला द्या..! आम्हाला समितीवर घ्या..ृ! या स्वार्थी व आपमतलबी मागण्यांसाठी तुम्ही माऊलींना थांबवता..? याचा आम्ही निषेध करतो. पंढरीत येणारा वारकरी हा साधा भोळा असतो. त्याच्या भावनांशी खेळ करुन वारकर्‍यांना तुमच्या स्वार्थासाठी भडकावून तुम्ही साधुसंतांच्या आषाढीतील अनेक वर्षाच्या पालखी सोहळ्याच्या परंपरेला गालबोट लागणारे कृत्य करता हे योग्य नाही..! तुमच्या या कृत्याचा आम्ही पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो..!

  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *