👁 7 Views

येरवडा जेलमध्ये क्षुल्लक कारणातुन एका कैद्याकडून दुसऱ्या कैद्याचा दगडाने ठेचून खून

पुणे- येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. आज (8 जून) सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दोन्ही कैदी स्वयंपाक घरात काम करत होते त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. आरोपी कैद्याने दुसऱ्या कैद्याचे लक्ष नसताना पाठीमागून दगडाने हल्ला केला. या घटनेत सुखदेव मेघराज महापूरे या कैद्याचा मृत्यू झाला. कारागृह प्रशासनाने येरवडा पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर येरवडा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. महापूरे अपहरणाच्या गुन्ह्यात 4 वर्षाची शिक्षा भोगत होता. तर आरोपी कैदी हा येरवडा जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *