👁 11 Views

Photos : त्या हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री ‘असे’ बचावले!

त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

अलिबाग येथील आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि पिएनपी नाट्यगृहाच्या उद्घाटनानंतर मुंबईला परत जात असताना मुख्यमंत्री हेलिकॉफ्टर अपघातातून बचावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुरक्षा रक्षक यांच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. अलिबाग येथील कार्यक्रमानंतर फडणवीस त्यांच्या हेलिकॉप्टरमधून मुंबईला परत जाण्यासाठी निघाले. दुपारी दोनच्या समारास डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या हेलिपॅडवरून त्यांचे हेलिकॉप्टर उड्डान करणार होते. नियोजित वेळेनुसार मुख्यमंत्री हेलिपॅडवर दाखल झाले. मात्र, ते बसण्यापूर्वीच हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेण्यास सुरुवात केली. सदर बाब मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांच्या लक्षात आली आणि ते हेलिकॉप्टरपासून तातडीने दूर गेले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर हेलिकॉप्टरची सुरक्षा तपासणी करुन मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघात झाला नसून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकारी पी डी मलिकनेर आणि पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आणि आमदार जयंत पाटील यांनी हेलिकॉप्टरच्या वैमानिकाकडून घडलेला प्रकार स्पष्ट केला होता. त्यामुळे सहवैमानिकाने मुख्यमंत्री तसेच सर्व प्रवासी बसल्याची खात्री का नाही केली, यासारखे प्रश्न उपस्थित झाले होते. यापूर्वी लातूरमध्ये फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा अपघाताची घटना घडली होती. लातूर दौऱ्यादरम्यान फडणवीस निलंग्याहून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी निघाले असताना हेलिपॅडची व्यवस्था नसल्यामुळे याठिकाणी असलेल्या एका शाळेच्या मैदानातून हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण केले. यावेळी हेलिकॉप्टर जमिनीवरुन काही उंचीवर असतानाच अचानक खाली कोसळले होते. सुदैवाने हेलिकॉप्टर खाली असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर येऊन आदळल्याने मोठा अनर्थ टळला होता. लाईटच्या तारेला हेलिकॉप्टरचा काही भाग लागल्यामुळे हा अपघात झाला होता.

  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *