👁 8 Views

विठोबाच्या महाद्वारात वारकर्‍यांचे भजन आंदोलन..!! … … अन्यथा हजारो वारकरी धडकणार मंत्रालयावर-बंडातात्या कराडकर

पंढरपूर : शासनाने नेमलेल्या मंदिर समितीला विरोध दर्शविण्यासाठी आज दु. 3 ते 5 या वेळेत आज पंढरीत विठोबाच्या महाद्वारात वारकरी सांप्रदायातील महाराज मंडळींनी, दिंडी प्रमुखांनी भजन आंदोलन केले. जर शासनाने आमचे म्हणणे ऐकुन योग्य तो निर्णय घेतला नाही तर लवकरच हजारो वारकर्‍यांसह मंत्रालयावर धडकणार असल्याचा इशारा ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी यावेळी दिला.

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या नवीन मंदिर समितीच्या विरोधात आता वारकरी नेते एकवटले असून तातडीने मंदिर समिती बरखास्त करून संपूर्ण वारकरी सदस्म असलेली समिती बनवण्मात मावी मा मागणीसाठी आज (गुरुवार) एल्गार पुकारण्यात आला. शासनाने याची दखल न घेतल्यास मंत्रालयावर मोर्चा आणू असा इशारा वारकरी नेत्यांनी दिला आहे.
आषाढी दशमीला या नवीन मंदिर समितीची माहिती मिळताच संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा दीड तास शहरात थांबवून या आंदोलनाला सुरुवात झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री आणि सदाभाऊ खोत यांना पालखी सोहळ्याशी चर्चेला पाठवून आंदोलन शांत केले होते. यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी याच समितीत उरलेल्या 2 जागा वारकरी संप्रदायाशी चर्चा करून ठरवू असे आश्वासन दिले होते.


शासनाच्या मा भूमिकेच्या विरोधात सर्व पालखीसोहळा प्रमुख, दिंडी प्रमुख आणि वारकरी नेत्यांनी काल संत ज्ञानेश्वर मंडप मेथे बैठक घेऊन शासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता.


सध्याच्या मंदिर समितीमध्मे बहुतांश सदस्य वारकरी नसून काही सदस्य तर अपेयपान आणि अभक्ष्य भक्षण करणारे असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शासनाने केवळ 2 सदस्यांची नेमणूक करीत वारकर्‍यांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी वारकरी कराडकर मांनी केला. आता मात्र नवीन मंदिर समिती तात्काळ बरखास्त करून संपूर्ण समिती वारकर्‍यांची केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नसल्याचेे त्यांनी सांगितले. सध्याच्या समितीत न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्या आरक्षित जागा भरामच्या आहेत त्याचे देखील सदस्य वारकरी संप्रदायात असून सर्वच जागा या वारकर्‍यातून भरण्याची मागणी असल्याचे बंडातात्या कराडकर यांनी सांगितले.


आज शनिवारी महाद्वारात भजन आंदोलन केले. उद्या पौर्णिमेला कोणताही पालखी सोहळा मंदिर समितीचा सत्कार स्वीकारणार नाही. पुढच्या श्रावण शुद्ध एकादशीला राज्यभरातील सर्व वारकरी नेते दिवसभर नामदेव पायरीजवळ भजन आंदोलन करणार असल्याचे वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी सांगितले. यानंतर देखील शासनाने दाखल न घेतल्यास राज्यभरातून हजारो वारकरी मंत्रालयावर येऊन धडकतील असा इशारा देखील कराडकर यांनी दिलाय.



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरा द्या.. 
अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे संपर्क- 8308838111

  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *