👁 10 Views

दादा काेंडकेंचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, 19 पैकी 17 चित्रपटांचे हक्क भाचे सुनेकडे

पुणे– अभिनेते दादा काेंडके यांच्या चित्रपटांच्या हक्कांवरून सुरू असलेली १२ वर्षाची लढाई काेंडके यांच्या नातेवाइकांनी जिंकली आहे. दादांच्या चित्रपटांचे हक्क त्यांची भाचेसून माणिक माेरे यांच्याकडे देण्याचा अादेश जिल्हा न्यायाधीश एस.बी.भालेकर यांनी दिला. दिल्ली येथील नूपुर कंपनीने दादांच्या चित्रपटांच्या बनावट सीडी, डीव्हीडी तयार करून त्या विक्री केल्याचा अाराेप माेरे यांनी केला हाेता. कोर्टाने परिस्थितीजन्य पुरावे तपासून काेंडके यांची बहीण लीलाबाई यांची मुलगी माणिक माेरे यांच्या बाजूने निकाल दिला.


हे आहेत चित्रपट
पांडु हवालदार, साेंगाड्या, वाजवू का, बाेट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर या मराठी चित्रपटांसह खाेल दे मेरी जुबान, अागे की सोच, तेरे मेरे बीच मैं, अंधेरी रात मे-दिया तेरे हाथ में या हिंदी चित्रपटांचा समावेश अाहे.

  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *