३६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होईल
CM Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारने सर्वांना सरसकट कर्जमाफी केली. यासाठी कुठल्याही अटी ठेवण्यात आली नाही.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली शेतकरी सन्मान योजना ही इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत मोठी असून यामुळे सुमारे ३६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात दिली. शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील असे सांगत कर्जमाफीचा दुरूपयोग होऊ नये म्हणून प्रत्येक बँक खात्याची आधार क्रमांकावरून पडताळणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारने सर्वांना सरसकट कर्जमाफी केली. यासाठी कुठल्याही अटी ठेवण्यात आल्या नाहीत. सर्व जण या योजनेसाठी पात्र ठरवले. दीड लाखांपर्यंतची कर्जे माफ करण्यात आली आहेत. जमिनीची मर्यादाही ठेवण्यात आलेली नाही. यामुळे ३६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होईल. कर्जाचे पुर्नगठण केलेल्यांनाही याचा फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले.
आतापर्यंत कोणत्याची सरकारने शेतकऱ्यांसाठी आमच्या इतका खर्च केलेला नाही, असे सांगत. पेरण्या उशिरा करा म्हणून आम्ही शेतकऱ्यांना एसएमएस पाठवला आहे. पाऊस उशिराने होईल, दुबार पेरणी टाळण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेत असल्याचे त्यांनी म्हटले. या वेळी त्यांनी नियमित कर्ज फेड करणाऱ्यांचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँका टिकल्या पाहिजे, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, वर्ष २००८ ची छोटी कर्जमाफी होती. तरीही त्यावेळेस काही घोटाळे झाले. कॅगनेही यावर ताशेरे ओढले होते. तसा प्रकार आता होऊ नये म्हणून यावेळी योग्य ती काळजी घेतली जाईल. त्यासाठी शेतकऱ्याच्या आधार क्रमाकांद्वारे बँक खात्याची पडताळणी केली जाईल. त्यामुळे आपोआपाच या कर्जमाफीचा दुरूपयोग होणार नाही.
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











