शेतकर्यांच्या समर्थनार्थ राजू शेट्टींनी थोपटले दंड
भोपाळ,
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकर्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या जमिनी घेऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. शेट्टींचा किसान मुक्ती मोर्चा शुक्रवारी इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी जबरदस्तीने जमिनी हस्तांतरित केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
राज्य सरकारने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी दर जाहीर केले आहेत. त्यानुसार शेतकर्यांच्या जिरायती जमिनीला सरासरी हेक्टरी ५० लाख रुपये दर मिळणार आहे. किमान ४० लाख रुपये ते ८५ लाख रुपये हेक्टरी भाव असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली आहे. हे दर एकरी असल्याची अगोदर चर्चा होती. मात्र, एकरी नव्हे तर हेक्टरी अर्थात अडीच एकरांसाठी ५० लाख रुपये भाव देण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी दर जाहीर केले असले तरी शेतकर्यांचा विरोध कायम आहे. त्यामुळे आपण शेतकर्यांच्या पाठीशी असून त्यांना लाखोंची भरपाई देण्याऐवजी त्यांची संमती घ्यावी. मात्र, जबरदस्तीने शेतकर्यांच्या जमिनी घेऊ देणार नाही, वेळ आलीच तर आंदोलनही करू, असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला आहे. (वृत्तसंस्था)
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा











