👁 11 Views

…तर ‘तिसऱ्या देशाचे सैन्य’ काश्मीरमध्ये घुसेल; चिनी माध्यमांची भारताला उघड धमकी

‘ग्लोबल टाईम्स’मधून चीनचा भारताला इशारा


संग्रहित छायाचित्र

भारतीय सैन्य जर भूतानच्या मदतीसाठी डोक्लाममधील रस्त्याच्या बांधकामात बाधा आणत असेल, तर त्याच तर्काच्या आधारे काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या विनंतीवरुन ‘तिसऱ्या देशाचे’ सैन्य प्रवेश करु शकते, अशी धमकी चीनकडून देण्यात आली आहे. भारत जर डोक्लाममध्ये भूतानची मदत करु शकतो, तर चीनदेखील पाकिस्तानच्या मदतीसाठी काश्मीरमध्ये प्रवेश करु शकतो, असा इशाराच चीनकडून देण्यात आला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून ही उघड धमकी देण्यात आली आहे.
‘भूतानकडून जरी भारताला मदतीची विनंती करण्यात आली असली, तरी स्थापित प्रदेशापर्यंतच भूतानला भारताची मदत घेता येईल. वादग्रस्त भागात भारतीय सैन्याला प्रवेश करता येणार नाही,’ असे चाइना वेस्ट नॉर्मल युनिव्हर्सिटीच्या भारतीय अध्ययन केंद्राचे संचालक लांग जिंगचुन यांनी ग्लोबल टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. ‘डोक्लाम भागात चीनकडून निर्माण केल्या जाणाऱ्या रस्त्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या भारताने वादग्रस्त जागेत प्रवेश करु नये. अन्यथा भारताच्या मदतीच्या तर्काचा आधार घेत, पाकिस्तानच्या मदतीच्या विनंतीवरुन काश्मीरमध्ये तिसऱ्या देशाचे सैन्य प्रवेश करेल,’ असे ग्लोबल टाईम्सच्या लेखात नमूद करण्यात आले आहे.
डोक्लाम भागात चीन आणि भारताच्या सैन्यामध्ये गेल्या तीन आठवड्यांमध्ये खडाजंगी सुरु आहे. या कालावधीत चीनच्या सरकारी वृत्तपत्रांनी अनेकदा चिथावणीखोर भाषेचा वापर करत तणाव वाढवला आहे. मात्र आता प्रथमच चीनकडून या वादात ‘काश्मीर’ आणि ‘पाकिस्तान’चा उल्लेख करण्यात आला आहे. भारताने सिक्किममधील हालचाली थांबवल्या नाहीत, तर थेट काश्मीरमध्ये प्रवेश करु, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे.
‘भूतानला मदत करण्याच्या नावाखाली चीनकडून डोक्लाममध्ये घुसखोरी करण्यात आली आहे. भूतानला मदत करण्याच्या बहाण्याने भारताकडून घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत,’ असे ग्लोबल टाईम्सने लेखात म्हटले आहे. यासाठी ग्लोबल टाईम्सकडून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ३० जून रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाचा संदर्भ दिला आहे. डोक्लाम भागात रस्ता बांधणीचे काम चीनकडून सुरु आहे. डोक्लाम या वादग्रस्त भागातील या रस्त्याच्या कामाला भारतीय सैन्याने विरोध दर्शवला आहे. डोक्लाम परिसर डोंगलांग प्रांताचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे.

  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *